कामगारांना आठ दिवसांत योजनांचा लाभ – भेगडे

पक्षांतर्गत इच्छुकांवर हल्लाबोल

मावळात सध्या काही इच्छुक मंडळी वेगळा प्रचार करत चुकीच्या बातम्या प्रसारित करत आहेत, सोशल मीडियाचा वापर करत टीका करत आहेत. टीका करणाऱ्यांनी खुशाल टीका करावी, मी कोणालाही रोखणार नाही, माझी बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी आहे, असे सांगत पक्षार्तंगत विरोधकांना बाळा भेगडे यांनी चपराक लगावली.

वडगाव मावळ  – मावळ तालुक्‍यातील 11 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना येत्या आठ दिवसांत योजनांचा लाभ आणि त्यांच्या खात्यावर लाभाचे पाच हजार रुपये जमा केले जातील, अशी ग्वाही राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिली.

कान्हे फाटा (ता. मावळ) येथील रामकृष्ण हरि मंगल कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 30) मावळ तालुक्‍यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 29 कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कामगार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाबुराव पाचर्णे, भीमराव तापकीर, कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. श्रीरंगम, अप्पर कामगार आयुक्‍त शैलेंद्र पोळ, विकास पनवेलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ पंचायत समिती सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, भाजप तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, नगरसेवक दिलीप म्हाळसकर, माऊली शिंदे, संदीप काकडे, नंदा सातकर, अमोल भेगडे, राजू सातकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.