Wai: वाईतील शिवस्मारकाचे काम अंतिम टप्प्यात; मंत्री मकरंद पाटील
Wai या स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम कोल्हापूर येथे सुरू असून, मंत्री मकरंद पाटील यांनी तेथे नुकतीच भेट देऊन, या कामाची पाहणी केली. स्वराज्याच्या इतिहासात वाई प्रांताला अनन्यसाधारण महत्त्व होते.

Wai: प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारले जात आहे. न्यायालयासमोरील मोक्याच्या जागेत उभारल्या जाणार्या या स्मारकाच्या चौथर्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
या स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम कोल्हापूर येथे सुरू असून, मंत्री मकरंद पाटील यांनी तेथे नुकतीच भेट देऊन, या कामाची पाहणी केली. स्वराज्याच्या इतिहासात वाई प्रांताला अनन्यसाधारण महत्त्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या या भूमीत त्यांचे भव्य स्मारक व्हावे, ही वाईकरांची दीर्घकाळापासूनची इच्छा होती. या स्मारकामुळे शहराच्या वैभवात आणि सौंदर्यात भर पडणार आहे.
मध्यंतरी तांत्रिक अडचणी आणि कच्च्या मालाच्या अनुपलब्धतेमुळे पुतळ्याच्या कामाला काहीसा विलंब झाला होता. मात्र, या कामासाठी आवश्यक असलेला निधी शिल्पकारांना यापूर्वीच देण्यात आला आहे. कोल्हापूर येथील कार्यशाळेत भेट देऊन, मंत्री मकरंद पाटील यांनी पुतळ्याची रचना, कलाकुसर आणि कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. हे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी शिल्पकारांना दिल्या.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, माजी नगरसेवक चरण गायकवाड, नगरसेवक भारत खामकर, डॉ. अमर जमदाडे, संग्राम पवार, संदीप जावळे, गुरुप्रसाद चव्हाण, सुशील खरात, संदीप नायकवडी, शब्बीर पठाण, पप्पू हागीर, महेश काळे व पदाधिकारी उपस्थित होते.





