Actress Tripti Dimri : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri ) तिच्या आगामी ‘मा बहन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा डार्क कॉमेडी चित्रपट ४ जून २०२६ या दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.अभिनेत्री सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तृप्ती डिमरीने फोटोशूट केले असून तिने काही फोटो इंस्टाग्रामवर केले आहेत. तिचा लूक साधा असून, चाहत्यांची मने तिने जिंकली आहेत.पिवळ्या-हिरव्या रंगाचा सूट तिने परिधान केलेला दिसत आहे. सोशल मीडियावर तृप्तीचे हे नवे फोटोशूट ट्रेंड होत आहेत. अभिनेत्रीने पिवळ्या रंगाच्या बेसवर हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंट सूट परिधान केला आहे, जो एक ताजेपणा आणि उन्हाळ्याची अनुभूती देतो. (Actress Tripti Dimri) View this post on Instagram A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri) यासोबत तिने मॅचिंग बॉटम्स आणि हिरव्या रंगाचा दुपट्टा परिधान केला आहे, ज्यावरील नाजूक नक्षी आणि बॉर्डर डिझाइनमुळे तो अधिकच मोहक दिसतो. हा लूक पूर्ण करण्यासाठी तृप्तीने सुंदर नक्षीकाम असलेले मोठे इअररिंग्स घातले आहेत. जे तिच्या आउटफिटला अगदी जुळणारे आहेत. तिने अनेक ब्रेसलेट्स देखील घातले आहेत, ज्यामुळे तिच्या लूकमध्ये पारंपरिक टच आला जाणवत आहे. अभिनेत्रीने आपले केस साईड पार्टिंगसह सॉफ्ट वेव्हजमध्ये मोकळे सोडले होते, ज्यामुळे तिच्या लूकला एक नैसर्गिक लुक मिळाला आहे. Actress Tripti Dimri Actress Tripti Dimri : साध्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं! तृप्ती डिमरीचं नव फोटोशूट व्हायरल या साध्या लूकमध्येही तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे. मेकअपबद्दल बोलायचं झालं तर न्यूड लिप शेड, हलका ब्लश आणि उठावदार डोळ्यांमुळे तिचा चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसत आहे. या फोटोसोबत तृप्तीने ‘आज माझ्या रोपांसोबत ट्विनिंग’ असे हटके कॅप्शन दिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांना तिचा साध्या लूक खूपच आवडला असल्याचे पोस्टवरील कमेंटवरुन लक्षात येते. हेही वाचा : US-China Tension: ट्रम्प यांचा यू-टर्न की रणनीती? ; शी जिनपिंग भेटीनंतरच चीनविरोधात मोठी घोषणा