Women’s T20 World Cup 2024 (IND vs AUS Score Update) : महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला फक्त जिंकायचे नाही तर मोठ्या फरकाने जिंकायचे आहे.
अशा या महत्तपूर्ण लढतीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 8 गडी गमावून 151 धावा केल्या असून भारतासमोर 152 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत ग्रेस हॅरिसने 41 चेंडूत 5 चौकारासह 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार ताहलिया मॅकग्राने 26 चेंडूत 4 चौकारासह 32 धावांची तर एलिस पेरीने 23 चेंडूत 2 चौकार अन् 1 षटकाराच्या मदतीने 32 धावांचे योगदान दिले.
Innings Break!
Australia post 151/8 in the first innings.#TeamIndia chase coming up, over to our batters 🙌
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/Nbe57MXNuQ#T20WorldCup | #INDvAUS | #WomenInBlue pic.twitter.com/hd6unzMWNC
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2024
भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंगने प्रत्येकी 2 बळी घेतले. दीप्तीने 4 षटकात 28 तर रेणूकानं 4 षटकात 24 धावा दिल्या. श्रेण्यका पाटील(4 षटकात 32 धावा), पूजा वस्त्राकर(3 षटकात 22 धावा) आणि राधा यादव (2 षटकात 14 धावा) यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण…
ऑस्ट्रेलियाचा निव्वळ धावगती मागे टाकण्यासाठी भारताला 10.2 षटकात किंवा त्यापूर्वी लक्ष्याचा पाठलाग करणे आवश्यक आहे. पराभव झाल्यास, निव्वळ रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडच्या पुढे राहण्यासाठी त्यांना किमान 139 धावा करणे गरजेचे आहे.