Nagarparishad Reservation | राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली. ३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या (एससी) महिलांसाठी आरक्षित असलेल्या 17 नगरपालिकेंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे 17 नगरपालिकांचा कारभार हा अनुसूचित जातींच्या महिलांच्या हातात असणार आहे. 17 नगरपालिका एससी महिलांसाठी तर सहा नगरपालिका या अनुसूचित जमाती (एसटी) महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामध्ये वणी, भडगाव, पिंपळनेर, उमरी, यवतमाळ, शेंदूर जना घाट या नगरपालिकांचा समावेश आहे. अनुसूचित जातीतील महिला आरक्षण (नगरपरिषद) देऊळगावराजा – SC महिलांसाठी राखीव मोहोळ – SC महिलांसाठी राखीव तेल्हारा – SC महिलांसाठी राखीव ओझर – SC महिलांसाठी राखीव वानाडोंगरी – SC महिलांसाठी राखीव भुसावळ – SC महिलांसाठी राखीव घुग्गूस – SC महिलांसाठी राखीव अकलूज – SC महिलांसाठी राखीव बीड – SC महिलांसाठी राखीव शिरोळ – SC महिलांसाठी राखीव चिमूर – SC महिलांसाठी राखीव शिर्डी – SC महिलांसाठी राखीव सावदा – SC महिलांसाठी राखीव मैनदर्गी – SC महिलांसाठी राखीव दिगडोहदेवी – SC महिलांसाठी राखीव दिग्रस – SC महिलांसाठी राखीव नगरपरिषदा अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव भडगाव (जळगाव) – ST महिलांसाठी राखीव वणी – ST महिलांसाठी राखीव पिंपळनेर (धुळे) – ST महिलांसाठी राखीव उमरी (नांदेड) – ST महिलांसाठी राखीव यवतमाळ – ST महिलांसाठी राखीव शेंदूरजनघाट – ST महिलांसाठी राखीव दरम्यान, आरक्षण जाहीर होण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारी निवडीस वेग येणार आहे. आरक्षणाची घोषणा होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. हेही वाचा: सोने पुन्हा चमकले! किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला ; वाचा आजचा भाव किती ?