शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार?
शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?
अहमदनगर – नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर येथील सभेत शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार? असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स एका महिलेने झळकावले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी आज प्रचारसभा घेतली. या सभेवेळी एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींची नगरमधील सभा चर्चेत आली आहे. या महिलेने सभेत मोदींच्या दिशेने शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार? असे प्रश्न विचारणारे पोस्टर झळकावले.
दरम्यान, मोदींच्या या सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही. तसंच सभेसाठी आलेल्या काही लोकांना काळ्या रंगाचं बनियान घातलं असल्यास ते उरवण्यास सांगितलं गेलं होतं.