प्रभात वृत्तसेवा आळंदी – पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना विना तारण बीज भांडवल देण्याचा उपक्रम आळंदी नगरपरिषदेत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत एकूण रुपये २० लाख ९० हजार रकमेचे चेक विविध बचत गटांना वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी महिलांना व्यवसायविषयक मार्गदर्शन करताना सांगितले की, “बीज भांडवल म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा आहे. या प्रसंगी कुशाग्र संस्था यांच्यातर्फे सौ. गीता मॅडम यांनी विशेष उपस्थिती दर्शवली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली पाटील (सहा. प्रकल्प अधिकारी) यांनी केले. पाच यशस्वी महिला उद्योजिकांनी आपले प्रेरणादायी अनुभव कथन करत बचत गटांमुळे व्यवसायात मिळालेल्या यशाची माहिती दिली.या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ शहर उपजीविका केंद्राच्या अध्यक्षा सुवर्णा काळे, कार्यालयीन प्रमुख अर्चना भिसे, समुदाय संघटक अर्जुन घोडे, सोनाली रत्नपारखी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेसाठी आर्थिक पाठबळ मिळाले असून, त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्याची संधी मिळाली आहे, असे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. चेक वाटप झालेल्या बचत गटांची माहिती -बचत गटाचे नाव मंजूर रक्कम -जागृती महिला बचत गट ३,२०,०००/- -सरस्वती महिला बचत गट ३,६०,०००/- -अलंकापुरी महिला बचत गट ३,६५,०००/- -संघर्ष महिला बचत गट ३,६५,०००/- -तेजस्विनी महिला बचत गट ३,२०,०००/- -इंदिरा महिला बचत गट ३,६०,०००/-