Womens Day : ‘या’ अभिनेत्रीने दिला स्त्री सशक्तीकरणाचा संदेश; पोस्ट शेअर करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी संदेश देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या दिवसाच्या निमित्ताने कंगनाने सोशल मीडियावर महिला सशक्तीकरणचा संदेश दिला आहे. या संदेशात तिने महिलांना देवीचा दर्जा दिला आहे. महिलांना पुरुषांच्या शूजमध्ये बसण्याची गरज नाही. तुमच्यात एक शक्ती आहे जी बाहेर काढायची आहे, असा संदेश तिने या पोस्टच्या माध्यमातून महिलांना महिलादिनी दिला आहे.
कंगना रणौतने तिच्या X अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक संदेश ट्विट केला आहे. महिलांना कोणाच्याही सारखं बनण्याची गरज नाही. त्याऐवजी, ती स्वतःमध्ये एक शक्ती आहे जी मुक्त करणे आवश्यक आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या, दिखाव्यासाठी पुरुषांसारखे बनण्याचा प्रयत्न करू नका आणि स्पर्धा टाळा. त्याचबरोबर महिलांनी दयाळू असावे, जिज्ञासू असावे, स्वत:हून अधिक बनून स्त्री व्हावे, असेही या अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले आहे.
On this international women’s day my message to all the women out there is, don’t let anyone convince you that you need to fit in to men’s shoes or compete with other women. No. You don’t need to be like anyone else, there is a Shakti waiting in you to be unravelled and…
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 8, 2025
महिला सक्षमीकरणाचा संदेश देताना अभिनेत्री म्हणाली की, संपूर्ण जगात प्रत्येकाला महिलांचे प्रेम आणि पाठिंबा मिळावा अशी इच्छा असते. लहानपणी तुम्हालाही प्रेम देणाऱ्या आईची गरज होती. तू देवी आहेस, प्रत्येकाला तुझी गरज आहे. तू सर्वस्व आहेस, असे सांगितले जाते. कंगना राणौत तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. तिचा काही दिवसांपूर्वी ‘इमर्जन्सी’ चित्रपट रिलीज झाला होता. ज्यामध्ये तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तिचा पुढचा चित्रपट एक तमिळ चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची कथा राजकारणावर आधारित असल्याची माहिती आहे. कंगना रौनत हिमाचल प्रेदश राज्यातील मंडी लोकसभा मतदार संघाची खासदार आहे.





