बुद्धिबळपटू ते ‘मशरूम लेडी’… Women’s Day निमित्ताने ‘या’ महिलांनी सांभाळली पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडियाची धुरा

Women’s Day 2025 | जगभरात आज (8 मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, त्यांचे अधिकार, समान संधी उपलब्ध करणे यासाठी हा दिवस पाळला जातो. या खास दिनानिमित्ताने नारी शक्तीला वंदन केले आहे. तसेच, त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची जबाबदारी महिलांकडे सोपवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची जबाबदारी महिलांकडे देण्यात येईल. असे म्हटले होते. आता त्यांनी दिलेला शब्द पाळत काही कर्तृत्वान महिलांकडे सोशल मीडिया अकाउंट्ची जबाबदारी दिली आहे.
We bow to our Nari Shakti on #WomensDay! Our Government has always worked for empowering women, reflecting in our schemes and programmes. Today, as promised, my social media properties will be taken over by women who are making a mark in diverse fields! pic.twitter.com/yf8YMfq63i
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2025
महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी लिहिले की, ‘महिला दिनी आपल्या नारी शक्तीला नमन करतो. सरकारने नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी काम केले असून, याचे प्रतिबिंब आपल्या योजना आणि कार्यक्रमांमधून नेहमीच दिसून आले आहे. वचन दिल्याप्रमाणे माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सची जबाबदारी विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांकडून दिली जाईल.’
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची जबाबदारी काही खास महिलांकडे सोपवली आहे. त्याचे एक्स अकाउंट भारतीय बुद्धिबळपटू आर. वैशालीद्वारे हाताळले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवरून तिने तिचा प्रेरणादायी प्रवास शेअर केला.
Vanakkam!
I am @chessvaishali and I am thrilled to be taking over our PM Thiru @narendramodi Ji’s social media properties and that too on #WomensDay. As many of you would know, I play chess and I feel very proud to be representing our beloved country in many tournaments. pic.twitter.com/LlYTmqE2MQ
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2025
याशिवाय, अणुशास्त्रज्ञ इलिना मिश्रा आणि अंतराळशास्त्रज्ञ शिल्पी सोनी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटची जबाबदारी घेतली. त्यांनी लिहिले की, महिला दिनी पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकाउंट सांभाळताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवरून त्यांचा प्रवासही शेअर केला.
मैं अनीता देवी, नालंदा जिले के अनन्तपुर गांव की रहने वाली हूं। मैंने जीवन में बड़े संघर्ष देखे हैं। लेकिन मेरा हमेशा से मन था, अपने दम पर कुछ करने का। 2016 में मैंने खुद स्वरोजगार करने का निर्णय लिया था। उसी दौर में स्टार्ट-अप्स का इतना क्रेज बढ़ गया था। इसलिए 9 साल पहले मैंने भी… pic.twitter.com/DFrQ8sDJd2
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2025
बिहारमधील नालंदा येथील अनिता देवी यांनाही एक दिवसासाठी पंतप्रधान मोदींचे सोशल मीडिया अकाउंट हाताळण्याची जबाबदारी मिळाली. त्यांना ‘मशरूम लेडी’ म्हणूनही ओळखले जाते. या व्यतिरिक्त इतर महिलांनी देखील त्यांचा प्रेरणादायी प्रवास पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सर्वांसमोर मांडला आहे.
दरम्यान, 2020 मध्येही महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया अकाउंट्सची जबाबदारी विविध क्षेत्रातील आघाडीच्या महिलांकडे सोपवण्यात आली होती.





