पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन; पंतप्रधान मोदींच्या फोटोची केली आरती
Updated On:

पुणे – देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात पुणे महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
अलका टॉकीज चौक येथील कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ महिला काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या फोटोची आरती करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.





