बाई…! काय हा प्रकार..? डॉक्टरने विचित्र पद्धतीने औषधे लिहिली, प्रिस्क्रिप्शन पाहून सगळेच ‘थक्क’

MP doctor । सर्वसाधारणपणे सर्व डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. त्यांना नेमकं काय होत आहे याबाबत विचारणा करतात. आणि त्यांना डॉक्टर प्रिस्क्रिप्शनमध्ये औषध लिहून देतात. जेणेकरून रुग्ण फार्मासिस्टकडे जाऊन औषधे घेऊ शकेल. फार्मासिस्ट प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली औषधे वाचतो आणि औषधे देतो. अशात डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले अक्षर नेमहमीच चर्चेत येत असते. कधी ते रुग्णांना वाचता येते तर कधी त्यातील काहीच कळत नाही. असं एक प्रिस्क्रिप्शनमध्ये सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सतना जिल्ह्यातील नागौड कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या डॉक्टरने लिहिलेली प्रिस्क्रिप्शन चांगलेच चर्चेत आले आहे. व्हायरल होत असलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये कोणत्या औषधाचे नाव लिहिले आहे ते वाचणे केवळ अवघडच नाही तर अशक्यही आहे.
प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या डॉक्टरचे नाव अमित सोनी असून नागौडच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात ते कार्यरत आहे. प्रिस्क्रिप्शननुसार, अरविंद कुमार सेन नावाची व्यक्ती डॉक्टरांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती. ओपीडीमध्ये फॉर्म बनवून घेतल्यानंतर ते डॉ.अमित सोनी यांच्याकडे गेले, त्यांनी तो फॉर्म कुणालाही वाचता येणार नाही अशा पद्धतीने लिहिला. कदाचित स्वत: डॉक्टरही प्रिस्क्रिप्शन पाहून सांगू शकणार नाहीत की कोणते औषध लिहून दिले आहे?
डॉक्टरांनी लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनबाबत रुग्णाने यापूर्वी शेकडो मेडिकल स्टोअर्सला भेट दिली आहे, परंतु प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले औषध वितरीत करणारा एकही फार्मासिस्ट सापडला नाही. डॉक्टरांचे हे अनोखे आणि अजब प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी ओपीडी स्लिपमध्ये अशा प्रकारे औषधे का दिली? जेणेकरून ते कोणी वाचू नये. डॉ अमित सोनी यांनी रुग्णाला आपल्या खाजगी दवाखान्यात बोलावले होते. रहिकवाडा येथील रुग्ण अरविंद कुमार सेन यांच्याकडे पैसे नव्हते. क्लिनिकमध्ये जाण्यास नकार दिला. अंगदुखीने त्रस्त असलेल्या अरविंदचे बोलणे ऐकून डॉक्टर संतापले आणि त्यांनी फॉर्म अशा पद्धतीने लिहिला की तो वाचणे अवघडच नाही तर अशक्य वाटले.
आरोग्य विभाग कारवाई करणार का?
नागौड रुग्णालयाचे डॉक्टर अमित सोनी यांचा हा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक लोक या डॉक्टरला ट्रोल करत आहेत. डॉक्टरांनी असे प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचे कारण स्पष्ट करावे, तसेच भविष्यात असे कृत्य कोणी करू नये, अशी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
=================





