पिंपरी | बनावट दागिने देऊन महिलेची तीन लाखांची फसवणूक
पिंपरी, (प्रतिनीधी) – लहान मन्यांचे सोनेरी रंगाचे झुंबर खरे आहे, असे भासवून त्या बदल्यात महिलेचे तीन लाखांचे सोन्याचे दागिने घेतले. याबाबत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी चारच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे घडली.
याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी यांची तोंड ओळख होती. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी महिलेला सोमाटणे फाटा येथे बोलावून घेतले. आरोपीकडील जास्त वजनाचे सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात तिच्याकडील दागिने घेण्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडत महिलेने सहा तोळे सोन्याचे गंठण व दोन तोळे सोन्याचे मंगलसुत्र लहान मन्याचे सोनेरी रंगाचे झुंबर खरे समजून त्या बदल्यात आरोपीला दिले. असे तीन लाखांचे दागिने आरोपीला दिले. मात्र, त्याच्याकडील झुंबर बनवट असल्याचे लक्षात येतातच तीने पोलिसांत धाव घेतली.




