प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिवरत्न सोसायटी, शिक्षक कॉलनी, शिरूर येथून एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह कोणतीही पूर्वसूचना न देता घर सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा मंगेश जौंजाळ (वय २६) आणि तिचा मुलगा सम्यक मंगेश जौंजाळ (वय ३) हे दोघे दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.०८ ते ११.३० च्या दरम्यान शिरूर येथील त्यांच्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता बाहेर गेले. नातेवाईकांकडे आणि परिचितांकडे शोध घेतल्यानंतरही त्यांचा काही पत्ता लागला नाही. हरवलेली महिला पुजा हिचे वर्णन – तिचा रंग गोरा असून चेहरा उभागोल, नाक बसके व शरीरयष्टी मजबूत आहे. ती निळ्या रंगाचा लेगिंग व जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान करून होती. तिच्या पायात गुलाबी रंगाची चप्पल होती व तिच्यासोबत रेडमी कंपनीचे दोन मोबाईल फोन होते, त्यांचे क्रमांक ८७८८३७४४०९, ७६६६८८७०४४ आहेत. हरवलेला मुलगा सम्यक हा काळा सावळा असून चेहरा गोल, नाक बसके आणि अंगाने मजबूत आहे. त्याने टी-शर्ट, हाफ पँट व पांढऱ्या रंगाचे बूट परिधान केले होते. या प्रकरणी पती मंगेश ताराचंद जौंजाळ शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भगत करत आहेत. पुजा व सम्यक यांच्याबद्दल काही माहिती असल्यास शिरूर पोलीस ठाण्यात किंवा तक्रारदार मंगेश जौंजाळ (संपर्क – ९३५९८२२७१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.