शिक्रापूर -वीजपुरवठा बंद असल्यामुळे चिडून जाऊन वायरमनला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पप्पू शंकर गायकवाड, बाळासाहेब भिकू लांडे, गणेश लांडे, सोमनाथ ताजणे, गणेश भुजबळ यांसह दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर राजेंद्र लक्ष्मण ऊरमुडे असे मारहाण झालेल्या वायरनचे नाव आहे. पैसे न दिल्याने वीजपुरवठा बंद? वायरमनला मारहाण होण्यापूर्वी त्या परिसरातील वायरमनला गावातील नागरिकांनी वीजपुरवठा बंद बाबत फोन केला असता दुसऱ्या वायरमनला पैसे न दिल्यामुळे त्याने वीजपुरवठा खंडित के;ाअ असल्याचे एका ज्येष्ठ वायरमनने सांगितले, त्याबाबतचे संभाषण देखील व्हायरल झाले आहे. त्यामुळे महावितरण विभागाचे कर्मचारी पैसे घेऊन काम करत असल्याचे व पैसे न दिल्यास लाइट कट केली जात असल्याचे बोलले जात आहे.