वडूज, (प्रतिनिधी) – महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या ऊर्जा क्रीडा मंडळाच्यावतीने वडूज, ता. खटाव येथील वसंतराव दाभाडे मैदानावर झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत वडूजच्या टीव्हीएस महावीर क्रिकेट संघाने ऊर्जा करंडक जिंकला. भोसरे, औंध येथील आर. के. कॅफे संघास उपविजेतेपद मिळाले. मायणीतील छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब आणि महावितरण वडूज या संघांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकवले. विजेत्या संघांना अनुक्रमे 31 हजार, 21 हजार, 15 हजार व 10 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. भोसरे येथील चैतन्य चिंचकरला ‘मॅन ऑफ द मॅच’, राहुल गोडसे (वडूज) व आकाश महापुरे (निमसोड) यांना उत्कृष्ट फलंदाज, आकाश पवार (मायणी) व नवनाथ जाधव (गुरसाळे) यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिके देण्यात आली. बनाजी पाटोळे, विशाल निकम, अक्षय खुडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. नानासाहेब जाधव (येरळवाडी), प्रसाद जगदाळे, शाहरुख डांगे यांनी स्पर्धेचे समालोचन केले. महावितरणचे कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के, उपअभियंता किरण डोईफोडे, धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अभियंता राक्षे, डावरे, धर्मे, अनिल साळुंखे, सयाजी कुंभार, ईश्वर शेळके, संदीप कुंभार उपस्थित होते. नवनाथ माळवे, सुनील येवले यांनी स्वागत केले. पोपटराव माळवे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पळे, अमर फडतरे, गणेश गोडसे, गणेश चव्हाण यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.