विम्बल्डन – कारकिर्दीतील विक्रमी विजेतेपदासाठी सेरेना विल्यम्स या 37 वर्षीय खेळाडूला येथील विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत 27 वर्षीय खेळाडू सिमोना हॅलेपचे आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. हा सामना जिंकून मीच अंजिक्यपद पटकावणार असा विश्वास सेरेना हिने व्यक्त केला आहे.
तिने म्हटले आहे की, विजेतेपद मला खुणावत असून त्यादृष्टीनेच माझी वाटचाल सुरू आहे. येथील कामगिरीबाबत मी खूप समाधानी आहे. विम्बल्डन हे माझ्यासाठी आवडते मैदान आहे व येथील चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांना मी निराश करणार नाही. हॅलेप ही जिगरबाज खेळाडू आहे, त्यामुळेच मी अंतिम सामनाही गांभीर्याने घेणार आहे. सामन्यास कलाटणी देण्याची तिच्याकडे क्षमता आहे हे लक्षात घेऊनच मला खेळावे लागणार आहे. त्यानुसार मी नियोजन केले आहे, असे सेरेनाने सांगितले.