Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर २०२५ चा हप्ता डिसेंबरच्या अखेरीस लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ चे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत. अनेक अधिकृत आणि माध्यमांच्या अहवालांनुसार, हे दोन्ही हप्ते एकत्रित म्हणजे ३,००० रुपये मकर संक्रांती (१४ जानेवारी २०२६) पूर्वी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या घोषणेवर काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून, मतदानाच्या आदल्या दिवशी (१४ जानेवारी) हप्ता जमा झाल्यास महिलांवर प्रभाव पडू शकतो आणि आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असा युक्तिवाद केला आहे. त्यामुळे निवडणूक संपल्यानंतरच हप्ता द्यावा, अशी मागणी केली आहे. वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे आदेश काँग्रेसच्या दाव्याची दखल राज्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. काँग्रेसच्या आरोपानंतर राज्य निवडणूक आयोगाने ‘लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का?’ अशी राज्य सरकारला विचारणा केली आहे. त्यावर राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सकाळी ११:०० पर्यंत याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Ladki Bahin Yojana | दरम्यान, लाडकी बहीण योजनेंतर्गत दोन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याच्या काँग्रेसचा दावा आहे. मात्र आता काँग्रेसने केलेल्या मागणीची निवडणूक आयोगाने दखल घेतल्याने आता लाडक्या बहिणींना संक्रांतीला भेट मिळणार की नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे, अजित पवार यांनी निवडणूक आयोगाने सांगितले तर, आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे ढकलू, असेही सांगितले आहे. हेही वाचा: Devendra Fadnavis: अजितदादांचा संयम ढळलाय!” देवेंद्र फडणवीसांचा थेट प्रत्युत्तर; ‘मोफत मेट्रो’वर म्हणाले..