Bhediya 2 Movie : वरुण धवन-कृती सॅनॉन पुन्हा एकत्र येणार? अभिनेत्रीने खास व्हिडिओ शेअर करत दिली हिंट
Bhediya 2 Movie : कृती सॅनॉनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. या व्हिडिओमध्ये ती वरुण धवन आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यासोबत दिसत आहे.

Bhediya 2 Movie : अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री कृती सॅनॉन आणि दिग्दर्शक अमर कौशिक हे तिघेही पुन्हा एकत्र दिसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या तिघांच्या भेटीचा व्हिडिओ कृती सॅनॉनने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तिने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमुळे ‘भेडिया २’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
कृती सॅनॉनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. या व्हिडिओमध्ये ती वरुण धवन आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यासोबत दिसत आहे. तिघेही कॅमेऱ्याकडे पाहून हसतात आणि त्यानंतर लांडग्यासारखे आवाज काढतात. त्यांच्या या कृतीमुळे चाहत्यांना ‘भेडिया’ चित्रपटाची आठवण झाली आहे.
या व्हिडिओसोबत कृतीने लिहिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. “एक आश्चर्यकारक पुनर्मिलन, जे तुम्हाला वेड लावेल. संपर्कात राहा.” वरुण धवननेही कृतीची ही स्टोरी आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर रिशेअर केली आहे.
View this post on Instagram
‘भेडिया २’ची घोषणा होणार का?
वरुण, कृती आणि अमर कौशिक यांचे हे पुनर्मिलन नेमके कोणत्या प्रोजेक्टसाठी आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, तिघांना एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर ‘भेडिया २’बाबत अंदाज बांधले जात आहेत.
अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात वरुण धवनने भास्करची भूमिका साकारली होती, तर कृती सॅनॉन एका पशुवैद्याच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
लांडग्याच्या चाव्यानंतर बदलते भास्करचे आयुष्य
‘भेडिया’ची कथा भास्कर नावाच्या रस्ते बांधकाम कंत्राटदाराभोवती फिरते. अरुणाचल प्रदेशातील जंगलात असताना एका लांडग्याने चावा घेतल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडू लागतात. हळूहळू त्याचे रूपांतर मानव-लांडग्यात होऊ लागते. या कथेत भय, विनोद आणि कल्पनारम्य घटनांची अनोखी सांगड घालण्यात आली होती.
IRAN: इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू? ; अमेरिकेच्या माजी जनरलचा खळबळजनक इशारा





