Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरे माघार घेणार? या तीन नेत्यांना लॅाटरी लागण्याची शक्यता
Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषद निवडणूक उद्धव ठाकरेंनी न लढण्याचा निर्णय घेतल्यास उद्धवसेनेकडून काही नावांची चर्चा या निवडणुकीसाठी सुरू झाली आहे.

Maharashtra Legislative Council Election : मे महिन्यात विधानपरिषदेतील 9 जागा रिक्त होणार असल्याने या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. अशा एकूण मिळून 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीला 1 एक जागा मिळू शकते. या निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक इच्छूकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी तिन्ही पक्ष सकारात्मक आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या हाती निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय आहे. जर उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास तयार नसतील तर त्यांच्या पक्षातील तीन नेत्यांना लॅाटरी लागण्याची शक्यता असून, त्यांच्या नावांची चर्चा होत आहे. (Maharashtra Legislative Council Election)
दुसरीकडे उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात नसतील तर महायुती अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यात महाविकास आघाडीतील मतं फुटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. Maharashtra Legislative Council Election
अतिरिक्त मतांच्या आधारावर महायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार 23 एप्रिल 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत असेल. 2 मे पर्यंत अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 मे रोजी असणार आहे. तर 12 मे रोजी मतदान होणार आहे.
या नावांची चर्चा (Maharashtra Legislative Council Election)
दरम्यान, उद्धव ठाकरे निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतात याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यास ठाकरे सेनेकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊतांच्या नावाची विधानपरिषदेसाठी चर्चा होत आहे. मात्र, यामध्ये काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
शरद पवार यांनी ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे कोणते नाव येईल, त्याला आमचा पाठींबा असेल असे जाहीर केले होते. तर, काँग्रेसने मात्र उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही पाठींबा देऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार यावर पुढची राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.
हेही वाचा : US-Iran War: “हो, मी पाकिस्तानला जाईन,आसिम मुनीर..” ; ट्रम्प यांनी पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव का केला?






