Two-wheeler toll : दुचाकी वाहनांना टोल भरावा लागेल? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले स्पष्ट

नवी दिल्ली – टोल प्लाझावर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल करण्याबाबत समाजमाध्यमांवर पसरणार्या खोट्या बातम्यांच्या संदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केलेल्या स्पष्टीकरणानुसार राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवरील टोल प्लाझावर दुचाकी वाहनांकडून कोणतेही वापरकर्ता शुल्क आकारले जात नाही.
राष्ट्रीय महामार्गांवरील वापरकर्ता शुल्क हे राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमाप्रमाणेच आकारले जाते आणि दुचाकी वाहनांवर पथकर आकारण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही.
नियमांनुसार टोल प्लाझावर चार किंवा त्याहून अधिक चाकांच्या वाहनांकडून वापरकर्ता शुल्क आकारले जाते. ज्यामध्ये कार, जीप, व्हॅन किंवा हलके मोटार वाहन. हलके व्यावसायिक वाहन, हलके माल वाहन किंवा मिनी बस, बस किंवा ट्रक, अवजड बांधकाम यंत्रसामग्री,किंवा अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट, किंवा मल्टी एक्सल वेहिकल, अवजड वाहने यांचा समावेश आहे.


