Kick 2 : बिग बॉस १९ चे पर्व संपल्यानंतर अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहे. तो सध्या अपूर्व लाखियाच्या “बॅटल ऑफ गलवान” या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे, या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह झळकणार आहे. या चित्रपटाशिवाय सलमान खानकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत, त्यापैकी एक ‘किक-२’ आहे, किक चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मेकर्सनी चित्रपटाचा सिक्वल करण्याचे ठरवले आहे. या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसणार होती. पण तिच्या चित्रपटातून एक्सिटच्या बातम्या समोर आल्या आहेत. तिच्या जागी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला संधी दिली जाणार आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडमधील वृत्तानुसार, निर्माता साजिद नाडियाडवाला सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त २७ डिसेंबर २०२५ रोजी किक २ ची अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. यामुळे चित्रपटात अभिनेत्री क्रिती सॅनेल जॅकलिनची जागा घेण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. साजिद नाडियाडवालाने गेल्या काही दिवसांपूर्वी एक पोस्ट देखील शेअर केली होती. या पोस्टमध्ये ‘द किक स्टार्ट विथ द मॅन’, असा मजूकर लिहिला होता. त्यानंतर किकच्या दुसऱ्या भागाची पुन्हा चर्चा सुरू झाली. २०१४ मध्ये सलमान खानचा किक चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर हिट ठरला. चित्रपटाने देशांतर्गत २३१.८५ कोटी आणि जगभरात ३८८ कोटींची भरगच्च कमाई केली होती. चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी, रणदीप हुड्डा आणि अर्चना पूरण सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता किक २ ची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. जर सारे काही ठरल्याप्रमाणे झाले तर २०२७ च्या ईदला ‘किक २’ प्रदर्शित करण्याची योजना आखली जाऊ शकते. हेही वाचा : Disha Pardeshi Dance: ‘देख तुनी बायको कशी…’ अहिराणी गाण्यावर ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्रचा धमाल डान्स