Ajit Pawar : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत भाजपवर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड येथे आयोजित प्रचार सभेतून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. यानंतर राज्याच्या राजकारणात याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेत्यांनी देखील अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. यानंतर भाजप आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. नुकत्याच दिलेल्या एएनआय वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत अजित पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. मुलाखतकाराने अजित पवार यांना विविध प्रश्न विचारले. यामध्ये आपल्यात आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढल्याचे चित्र आहे. अंबरनाथमध्ये जे काही झाले, त्यामुळे भाजपला आश्चर्य वाटले आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील नात्यात काही फरक पडणार का ? यावर अजित पवार यांनी दोनच शब्दांत उत्तर दिले. नाही पडणार असे ते म्हणाले. पुढे मुलाखतकार म्हणाले, १६ तारखेनंतर राज्य सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे तणाव असणार नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का? अजित पवार म्हणाले, १०० टक्के नाही होणार. २०१७ मध्ये जर आपण बातम्या वाचल्या असतील, तर प्रिंट मीडियामध्ये वेगळेच वाचायला मिळेल. एका महिन्यानंतर लोकं विसरून जातात, असे मोठं विधानही अजित पवार यांनी केले आहे. #WATCH | Pune: On being asked if his relations with CM Devendra Fadnavis will be affected after the alliance of both factions of NCP after local body elections in the state, Maharashtra Deputy CM Ajit Pawar says, “No, it will not be affected. 100% it (differences between CM and… pic.twitter.com/utlvABotki — ANI (@ANI) January 13, 2026 अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलं? याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक असतानाही सदाशिव पाटील हे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये एकूण 59 नगरसेवक आहेत. काँग्रेसच्या १२ नगरसेवक निवडणूक आले होते. भाजपने आपले संख्याबळ वाढवण्यासाठी काँग्रेससोबत युती केली होती, ज्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी खेळ करत भाजपला चेकमेट दिला. या आघाडीकडे बहुमताचा आकडा 31 पेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले असतानाच आणखी एक नाट्यमय घडामोडी घडली. या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी अचानक शिवसेना शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. हेही वाचा : Bhogi Celebration 2026 : भोगीची भाजी, तीळाची भाकरी आणि परंपरेचा सण; भोगीचे धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व