Maharashtra Weather Update | राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळत आहेत. ऑगस्ट महिन्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील अनेक ठिकाणी पाऊस कायम असल्याचे दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर 2025 मध्ये देशाच्या बहुतेक भागात सामान्य ते त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक असण्याची शक्यता दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरी पावसाचा अंदाज आहे. Maharashtra Weather Update | यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर देशात 109 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ईशान्य व पूर्व भारतातील काही भाग, दक्षिण भारतातील अनेक भाग, उत्तर भारताच्या काही भागांत सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. Maharashtra Weather Update | जोरदार पावसाची शक्यता राज्यात आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. याशिवाय उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील काही दिवस हवामानात चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. हेही वाचा: Aishwarya Rai Bachchan: आराध्यासह ऐश्वर्या राय जीएसबी मंडपात बप्पांच्या दर्शनाला; चाहत्यांनी विचारलं ,“आराध्याला काय झालंय?”