‘किंग’मध्ये ३० वर्षांनी अॅानस्क्रीन भावंडांच त्रिकूट परतणार? अनिल कपूरनंतर जॅकीची एन्ट्री होणार?

King Movie : अभिनेता शाहरुख खान त्याच्या किंग चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाविषयीच्या नव्या अपडेट समोर येत असून आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. किंग चित्रपटात आता ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूरची एन्ट्री झाली असून जॅकी श्रॅाफ देखील या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच सुरूवात होणार असून कास्टिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा त्रिमूर्ती किंग चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिद्धार्थ आनंद या चित्रपटाते दिग्दर्शन करणार असून अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण यांच्यासह इतरही अनेक कलारांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत. शाहरुखची मुलगी सुहाना ही पहिल्यांदाच त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात एकमागून एक अनेक कलाकारांची एन्ट्री होत आहे. दीपिका पादुकोणनंतर अनिल कपूर आणि त्यांचे अॅानस्क्रीन मोठा भाऊ अर्थात जॅकी श्रॅाफची एन्ट्री होणार आहे. मात्र, जॅकीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याची किंगमध्ये एन्ट्री होणार का? हे पाहावे लागणर आहे.
वॉर आणि पठाण या चित्रपटांचे दिग्दर्शक करणारे सिद्धार्थ आनंद हे किंगचे दिग्दर्शन करणार असून २० मे पासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अभिनेता अभिषेक बच्चन खलनायकाची भूमिका चित्रपटात साकारणार आहे. तर अनिल कपूरचही लक्षवेधी भूमिका असणार आहे. त्रिमूर्ती या चित्रपटानंतर तब्बल ३० वर्षांनी खान-कपूर-श्रॅाफ ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे किंगची मोठी उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे.





