आयकर विभाग भाजपाच्या नेत्यावर छापे टाकेल का ?-एम.के. स्टॅलिन

चेन्नई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांमध्ये विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच तमिळनाडूमधील द्रविड मुनेत्रा काझगम (डीएमके) पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी आयकर विभागाला खुले आव्हान दिले आहे. आयकर विभागाने नरेंद्र मोदी आणि इतर भाजपा नेत्याच्या घरी छापे टाकावेत, असे एमके स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

स्टॅलिन यावेळी बोलतांना म्हणाले, दुमई मुरगन यांची माहिती मिळाल्यावर त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. नरेंद्र मोदींच्या घरी करोडो रुपये असतील, असे मी सांगितले, तर आयकर विभाग मोदींच्या घरावर छापा टाकेल का, असा सवाल स्टॅलिन यांना केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.