हॉलिवूड सुपरस्टार अभिनेता वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार?

Hollywood | हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. अभिनेत्याने अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड इनेस डी रॅमनला प्रपोज केल्याचे म्हंटले जात आहे. यामुळे आता तो नव्या इनिंगला सुरुवात करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
एका वृत्तानुसार, ब्रॅड पिट सहा आठवड्यांच्या शूटिंगसाठी न्यूझीलंडला जाणार आहे. त्यापूर्वी ब्रॅड पिटने इनेस डी रॅमनला लग्नासाठी प्रपोज केले. रॅमन देखील घटस्फोटित आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर तिने २०२२ मध्ये ‘द व्हॅम्पायर डायरीज’ फेम पॉल वेस्लीशी घटस्फोट घेतला होता. ३२ वर्षीय रॅमन एक ज्वेलरी डिझायनर आहे.
दरम्यान, हॉलिवूड अभिनेत्याने पहिले लग्न २००० मध्ये अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनशी केले होते. परंतु २००५ मध्ये, ‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’च्या शूटिंगदरम्यान अँजेलिना जोलीशी त्याची जवळीक वाढली.
अखेर, ‘फ्रेंड्स’ फेम जेनिफर अॅनिस्टनने मतभेद असल्याचे सांगत घटस्फोटासाठी अर्ज केला आणि त्यांचे नाते ऑक्टोबर २००५ मध्ये संपले. त्यानंतर २०१४ मध्ये, ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांनी त्यांच्या फ्रेंच इस्टेट, चाटो मिरावल येथे लग्न केलं. या जोडप्याला सहा मुलं आहेत, त्यापैकी तीन मुलं दत्तक आहेत. पण, त्यांचे नातेही फार काळ टिकू शकले नाही.
दोघांच्या वेगळं होण्याचा हा कायदेशीर लढा बराच काळ चालला. २०१६ मध्ये घटस्फोटाच्या अर्जानंतर ३० डिसेंबर २०२४ रोजी त्यांचे नाते संपले. यानंतर आता अभिनेता तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा:





