Hasan Mushrif : गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी वेळ मतदान करण्यासाठी आखून दिली होती. या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; पण अचानक मतदानाच्या दिवशी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एक मोठा निर्णय घेतला. या निवडणुकीचा निकाल आणि २० डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीचा निकाल एकत्रित एकाच दिवशी म्हणजेच २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकाल लांबवणीवर टाकल्याने नाराजी व्यक्त केली. नगरपरिषद आणि नगरपंचातींचा मतमोजणी करून निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. पण अशातच आता महायुतीमधील एका मंत्र्यांने एक मोठं विधान केले आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अजित पवार गटाचे बडे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीचा निकाल २१ डिसेंबरपूर्वी लागू शकतो, असे मोठं विधान केले आहे. मतदान केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुश्रीफांनी वरील विधान केले आहे. नेमकं काय म्हणाले हसन मुश्रीफ? “उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे, त्या विरोधात सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल. त्यामुळे २१ डिसेंबरच्या आधीही हा निकाल लागू शकतो. पण सध्या निकालाची तारीख २१ डिसेंबर ठरली आहे. त्यामुळे मला वाटतंय की आपण पर्यटन करून यावं. तिरुपतीला जाऊन यावं किंवा थंड हवेच्या ठिकाणी जावून यावं. पुढच्या दोन दिवसात मतदारांचे आभार मानून पर्यटनाला जाऊन या” महत्वाची माहिती समोर या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरचा का जाहीर करण्यात येणार आहे, याबाबत आता माहिती समोर आली आहे. फ्री अँण्ड फेअर इलेक्शन बाधित होईल, असा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती आहे. तर २० तारखेच्या दिवशी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल दाखविण्यात यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता २० तारखेपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता चालू राहणार आहे. हेही वाचा : Samantha Ruth Prabhu: लग्नानंतर समंथाची बहिणींना उद्देशून भावूक पोस्ट