Ladki Bahin Yojna | महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली होती. या योजनेद्वारे दरमहा महिलांच्या खात्यामध्ये 1500 पाठवले जात होते. आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्याने महिलांच्या खात्यावर सरकारकडून 2100 रुपये पाठवण्यात येणार आहे. या पैशांमुळे महिलांना आर्थिक मदत मिळेल आणि त्या आपल्या गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतील. हा योजना सुरु करण्यामागचा उद्देश होता.
ही योजना फक्त महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे. आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. Ladki Bahin Yojna |
आदिती तटकरे काय म्हणाल्या ?
आदिती तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. छाननीबाबत चुकीची चर्चा सुरू आहे. कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरीत्या ही योजना राबवलेली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojna |
“एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. आता नव्याने तक्रार आली असेल तर मला त्याबाबत माहिती नाही. पण तक्रारी असतील तरच त्याबाबतीतच छाननी होईल, या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही,” असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत शेकडो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेस पात्र ठरल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून 2 हजार 100 रूपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून 2100 रूपये करणार असून बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू, असे आश्वासन दिले आहे. Ladki Bahin Yojna |
हेही वाचा: