Sikandar Movie Advance Booking | सलमान खान आणि रश्मिका मंदना यांचा बहुप्रतिक्षित सिंकदर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता सिंकदरला रिलीज होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काल म्हणजेच २५ मार्चपासून चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनकडून मिळत आहे. ३० मार्चला सिंकदर थिएटरर्सध्ये रिलीज होणार आहे. दबंग सलमान आपल्या चाहत्यांना ईदच्या दिवशी नव्या चित्रपटाची भेट देत असतो. दरवर्षी चाहत्या त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. ईदच्या निमित्ताने सलमानचा सिंकदर बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंकदरच्या टीमने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची व्हाइब सेट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही करण्यात आले आहे. सिंकदर छावा चित्रपटाने ओपनिंग डे दिवशीच्या कमाईपेक्षा जास्त कमाई करु शकणार का याकडे आता लक्ष लागले आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सिंकदर इतर मोठ्या चित्रपटांचे रिकार्ड मोडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘सिकंदर’च्या प्री-तिकीट सेलचे आकडेही समोर आले आहेत. हे आकडे पाहून सलमान खानचा सिकंदर पहिल्या दिवशी कमाईचे सर्वच्या सर्व रेकॉर्ड मोडू शकतो, अशी शक्यता आहे. सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार, ‘सिकंदर’ची 67 हजार 182 तिकिटं हिंदी 2 डी स्वरूपात विकली गेली. आयमॅक्स 2 डी मध्ये चित्रपटाची 45 हजार 94 तिकिटं विकली गेली आहेत. यासह, देशभरात अवघ्या काही तासांत चित्रपटाची 67276 तिकिटं प्री-सोल्ड झाली आहेत. या चित्रपटानं जागा रोखल्याशिवाय अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 1.92 कोटी रुपये कमावले आहेत. ब्लॉक सीट्ससह, ‘सिकंदर’नं आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 6.11 कोटी रुपये कमावले आहेत. सिकंदरचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केले असून या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्यासह अनेक कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका आहेत. सलमान खान 2014 च्या ब्लॉकबस्टर किक या चित्रपटानंतर निर्माता साजिद नाडियाडवालासोबत पुन्हा काम करत आहे.