संजय जगताप संपत्ती दान करणार का?

राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा सवाल 

दिवे – सासवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी (दि. 15) सभा झाली. त्यावेळी त्यांच्यासमोरच जनसमुदायाला संजय जगताप यांनी गुंजवणीच्या पाइपलाइनमध्ये दोन वर्षे कसे अडथळे आणले याचे अधिकृत पुरावे सादर केले आहेत, त्यामुळे जगताप यांचा खोटारडेपणा उघड झाला असून ते आता संपत्ती दान करणार का, असा प्रश्‍न जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपस्थित केला आहे.

पुरंदर-हवेली मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी जगताप यांना सवाल उपस्थित केला आहे. यावेळी नगरसेवक सचिन भोंगळ, युवासेनेचे मंदार गिरमे यांच्यासह शिवसेना, भाजप, आरपीआया व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
विजय शिवतारे म्हणाले की, गुंजवणीच्या पाइपलाइनमध्ये मी अडथळा आणल्याचे सिद्ध केले, तर सगळी संपत्ती दान करील असे वक्‍तव्य संजय जगताप यांनी केले होते. मात्र, संपत्तीसाठी नव्हे तर जनतेला जगताप यांचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी मिळू नये म्हणून त्यांनी हा सगळा खटाटोप केला होता.

मात्र, त्यांचा खटटोप पुराव्यानिशी हाणून पाडला असून ते पुरावे तालुक्‍यातील जनतेला देखील खुले केले आहे. यावर संजय जगताप यांच्या स्वाक्षरी, फोटो आणि कसेकसे अडथळे आणले गेले व न्यायालयाने ते कसे धुडकावून लावले याबाबतची माहिती प्रसिद्ध केली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सचिन भोंगळे यांनी मनोगत व्यक्‍त केले.

प्रा. दुर्गाडे यांचे काही वावगे आहे का?
प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या निवडणुकीवेळी संजय जगताप यांनी आघाडीचा धर्म न पाळता बंडखोरी केली आणि दुर्गाडे पराभूत झाले. संजय जगताप यांची वेळ आली की आघाडी धर्म पाळा म्हणून सांगितले जाते, मग दुर्गाडे यांच्यावेळी का नाही पाळला, त्यांचे काही वावगे आहे का, असा प्रश्‍न मंदार गिरमे यांनी संजय जगताप यांना उपस्थित केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)