Salman Khan Sikander Movie | बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट यावर्षी ईदला प्रदर्शित होणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत सर्वांच खूप उत्सुक लागली आहे. ‘सिकंदर’ सिनेमा ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार हे आधीपासूनच ठरलेलं होतं. परंतु ‘सिकंदर’चा ईदचा रिलीज डेटचा मुहुर्त टळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदान्ना जखमी झाली आहे आणि त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आले. रश्मिका मंदानाने एक पोस्ट शेअर केली होती.
ज्यात तिने सांगितले होते की, तिला जिममध्ये दुखापत झाली. ती पुढील काही आठवडे आणि महिने विश्रांती घेत आहे. पण रश्मिका लवकरच थमा आणि सिकंदरच्या सेटवर परतणार आहे. ईद मार्चमध्येच असल्याने चित्रपटाची अनेक मोठी कामे अजून बाकी आहेत. जर रश्मिका मंदानाचा भाग वेळेवर चित्रित झाला नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होऊ शकतो. Salman Khan Sikander Movie |
View this post on Instagram
नुकताच तिचा एक विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तिच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसत आहे. यावेळी ती व्हिलचेअरचा आधार घेताना दिसली होती. अशा परिस्थितीत ती शूटिंग पूर्ण करू शकणार का? असा उपस्थित केला जात आहे. साजिद नाडियादवाला निर्मिता ए. आर. मुरुगोदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ सिनेमात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. तर त्याच्यासोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे. Salman Khan Sikander Movie |
हेही वाचा:
Nitesh Rane : सैफवरील हल्ला संशयास्पद, चाकूने हल्ला झाली की…..; नितेश राणे नेमक काय म्हणाले?