… तर राजकारणातून संन्यास घेणार; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे. आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणूनच मी त्याग करेल असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
या देशात आरक्षण, हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत उगीचच अपप्रचार एवढा झाला, की लोकं त्याला बळी पडलेत. पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि आमच्यासारखे अनेक लोक जे संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत, ते असं होऊ देणार नाही. असं स्पष्ट वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
महायुतीचे सरकार येणार
महाराष्ट्रात तिन्ही पक्ष महायुती म्हणून काम करत आहेत आणि यशस्वीरीतीने या महाराष्ट्रमध्ये निवडणूकमध्ये सामोरे जाणार. महाराष्ट्रमध्ये आपले सरकार बनवणार, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.





