Sunil Raut : …तर आमदारकीचा राजीनामा देणार; आमदार सुनील राऊत यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : 23 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळाले तर मविआला मोठा फटका बसला. या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर टीका करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडायला सुरुवात केली. यादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू आणि नवनिर्वाचित आमदार सुनील राऊत यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
काय म्हणाले सुनील राऊत?
महाराष्ट्रात लागलेला निकाल हा अत्यंत अविश्वसनिय असून या निकालामुळे राज्यातील जनता अजिबात खुश नाही. हा निकाल अविश्वासनीय असून मला सुद्धा या निकालावर विश्वास नाही. त्यामुळे जर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेत असतील तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
महायुती जिंकली आहे पण महायुती जिंकेल असं कोणाला वाटलं नव्हतं, महाविकास आघाडी जिंकली पाहिजे होती असं वातावरण या संपूर्ण महाराष्ट्रात होतं. EVM घोटाळा केल्यामुळेच महायुतीचा विजय झाला आहे असा दावा देखील सुनील राऊत यांनी केला आहे.





