Stree 3 Release Date: राजकुमार राव-श्रद्धा कपूर पुन्हा दिसणार? ‘स्त्री 3’बाबत मोठी अपडेट समोर
Stree 3 Release Date ‘स्त्री 2’ हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. चित्रपटाच्या यशानंतर ‘स्त्री 3’ कधी येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. आता या प्रतीक्षेला काही प्रमाणात उत्तर मिळाले आहे.

Stree 3 Release Date: मनोरंजन विश्वातील लोकप्रिय हॉरर-कॉमेडी फ्रँचायझी ‘स्त्री’च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ आणि ‘स्त्री 2’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे आता या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच ‘स्त्री 3’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर या चित्रपटाच्या रिलीजबाबत निर्माता दिनेश विजान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
‘स्त्री 2’ हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. चित्रपटाच्या यशानंतर ‘स्त्री 3’ कधी येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. आता या प्रतीक्षेला काही प्रमाणात उत्तर मिळाले आहे.
2028 मध्ये रिलीज होणार ‘स्त्री 3’
पीटीआयच्या वृत्तानुसार, FICCI FRAMES कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी निर्माता दिनेश विजान यांनी ‘स्त्री 3’बाबत माहिती दिली. दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री 3’ची कथा पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा चित्रपट 2028 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, ‘स्त्री 3’ची नेमकी रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 2028 मध्ये स्वातंत्र्यदिन किंवा ख्रिसमसच्या आसपास चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचे दिनेश विजान यांनी सांगितले आहे. त्यामुळे चाहत्यांना अजून काही काळ अधिकृत तारखेची वाट पाहावी लागणार आहे.

Stree 3 Release Date
कथेबद्दल सध्या गुपित कायम
‘स्त्री 3’च्या कथेबाबत दिनेश विजान यांनी फारशी माहिती देण्यास नकार दिला. यामागचे कारणही त्यांनी मजेशीर पद्धतीने सांगितले. अमर कौशिक आपल्याला स्पॉयलर दिल्याबद्दल रागावतात, त्यामुळे चित्रपटाबाबत जास्त माहिती सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.
मात्र, मागील दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना जे आवडले, ते ‘स्त्री 3’मध्येही पाहायला मिळेल, असे त्यांनी संकेत दिले. त्याचबरोबर तिसऱ्या भागाची सुरुवात कुठून होईल आणि कथा कुठे जाऊन संपेल, हे पूर्णपणे नवीन सरप्राइज असेल, असेही त्यांनी सांगितले.
आधी ‘महावतार’, त्यानंतर ‘स्त्री 3’
‘स्त्री 3’च्या आधी दिग्दर्शक अमर कौशिक त्यांच्या आगामी ‘महावतार’ या चित्रपटावर काम करणार आहेत. भगवान परशुराम यांच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दिनेश विजान यांच्या मते, अमर कौशिक हे ‘स्त्री’ फ्रँचायझीचा महत्त्वाचा भाग आहेत. ते जानेवारीच्या अखेरीस ‘महावतार’च्या कामाला सुरुवात करणार असून जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील वर्षाच्या अखेरीस ‘स्त्री 3’च्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ‘महावतार’ची निर्मिती दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सकडून केली जात आहे. या चित्रपटाची कथा निरेन भट्ट यांनी लिहिली आहे.
दरम्यान, ‘स्त्री 3’मध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर पुन्हा दिसणार का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाची कथा, कलाकार आणि रिलीजची नेमकी तारीख याबाबत पुढील अपडेट्सची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मात्र 2028 मध्ये ‘स्त्री’ पुन्हा मोठ्या पडद्यावर परतणार असल्याने फ्रँचायझीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता नक्कीच वाढली आहे.





