“मोदींसमोर हा मुद्दा उपस्थित करणार, अन्यथा राजीनामा देणार”; समाजवादी पक्षाच्या खासदारांना अश्रु अनावर

Milkipur Assembly By-Election| अयोध्येतील मिल्किपूर मतदारसंघात काही दिवसांत मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी घडलेल्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अयोध्येत एका दलित मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.
दलित युवतीचे शव भयावह स्थितीत आढळून आले आहेत. तिच्या शरीरावर अनेक जखमी असून अनेक हाडेही मोडलेल्या स्थितीत आहेत. तिचे डोळेही काढण्यात आले. या घटनेवर भाष्य करत असताना अयोध्येचे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले आहेत.
दलित युवतीची हत्या झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अवधेश प्रसाद म्हणाले, “आत्तापर्यंत मी निर्भया हत्याकांडाबाबतचे ह्रदयद्रावक घटना ऐकत होतो. काल मी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलो होतो. लोकांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. आता आम्ही देशापुढे जाऊन काय बोलणार? देश आम्हाला याबाबत विचारणा करेल,” असं म्हणत समाजवादी पक्षाचे खासदार पत्रकार परिषदेत रडू लागले.
पुढे ते म्हणाले, “एका दलित मुलीला विवस्त्र करुन काय काय करण्यात आले. तिची हत्या करण्यात आली. तिचा अंत्यविधी हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार होऊ शकला नाही. तिचा दफनविधी करण्यात आला. मी लोकसभेच्या मोदीसमोर हा मुद्दा उपस्थित करीन. न्याय मिळाला नाही तर मी राजीनामा देईन,” असा इशाराही त्यांनी दिला.
&
यह जघन्य अपराध बेहद दुःखद हैं।
अयोध्या के ग्रामसभा सहनवां, सरदार पटेल वार्ड में 3 दिन से गायब दलित परिवार की बेटी का शव निर्वस्त्र अवस्था में मिला है, उसकी दोनों आँखें फोड़ दी गई हैं उसके साथ अमानवीय व्यवहार हुआ है।
यह सरकार इंसाफ नही कर सकती। pic.twitter.com/aSvI3N74Kl
— Awadhesh Prasad (@Awadheshprasad_) February 2, 2025
….तर मुलीचे प्राण वाचू शकले – अखिलेश यादव
या घटनेबाबत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “अयोध्येतील ग्रामसभा सहानवन येथे 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दलित कुटुंबातील मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला आहे. तिचे दोन्ही डोळे फोडलेले होते. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. तिला अमानुष वागणूक दिली गेली. प्रशासनाने तीन दिवस आधीच कुटुंबियांच्या माहितीकडे लक्ष दिले असते तर मुलीचे प्राण वाचले असते.”
मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक
मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. येथे समाजवादी पक्षाने अजित प्रसाद यांना उमेदवारी जाहीर केली होती. येथील आमदार अवधेश प्रसाद यांनी लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारंघातून विजयी झाल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. येत्या 5 फेब्रुवारी रोजी येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीत अवधेश प्रसाद यांचा मुलगा मैदानात आहे. आता समाजवादी पक्ष आणि भाजपाने ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण भर दिला आहे.
हेही वाचा:
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य ; अपहरणानंतर गोरक्षकाची हत्या, जंगलात आढळला मृतदेह

