Lok Sabha Result 2024 Live | लोकसभा निवडणूकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आजच्या या निकालानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या लोकसभा निवडणुकाच्या या निकालाबाबत सर्वांची उत्सुकता लागली आहे. एनडीए आणि इंडिया यांच्या लढतीत एनडीएने चांगली आघाडी घेतली आहे. यंदा राहुल गांधी काँग्रेसचे खासदार केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा जागांवरून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही मतदार संघातून राहुल गांधी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. राहुल गांधी रायबरेलीमधून भाजपचे दिनेश प्रताप सिंग यांच्याविरोधात तर वायनाडमध्ये भाजपचे के सुरेंद्रन आणि सीपीआय-एमच्या ॲनी राजा यांच्या विरोधात आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी ८० हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर दिसून आले. तर उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी २८ हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने आघाडी घेतली. विशेष म्हणजे रायबरेलीसाठी अगदी शेवटच्या क्षणाला कॉँग्रेसकडून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, २०१९ मध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशातील या एकमेव जागेवर सोनिया गांधी यांनी विजय मिळवला होता. तर २०१९ मध्ये अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव झाला होता. तर वायनाड मतदारसंघात राहुल गांधींनी यश कायम राखले होते. आता देखील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.