Indurikar Maharaj : किर्तनाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे इंदुरीकर महाराज त्यांची कन्या ज्ञानेश्वरी हिच्या शाही थाटात पार पडलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून ट्रोल झाले होते. संगमनेर येथील एका लॅान्समध्ये त्यांच्या मुलीचा शाही साखरपुडा सोहळा मोठ्या थाट्यात पार पडला. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर अनेकांनी हजेरी लावली होती. याशिवाय काही राजकीय नेते देखील उपस्थित होते. सोशल मीडियावर साखरपुडा सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंदुरीकर महाराज यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अंदाजे २००० लोकांच्या उपस्थित पार पडलेल्या शाही साखरपुड्याची मोठी चर्चा झाली होती. महाराजांची लेक ज्ञानेश्वरी भला मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मंगल कार्यालयात डोळ्यावर गॉगल लावून पोहोचली. लोकांना किर्तनातून साध्या पद्धतीने लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराज यांना त्यांच्याच मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. यामुळे ते टीकेचे धनी बनले. त्यानंतर त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. पण आता लवकरच इंदुरीकर महाराज अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी केलेल्या विधानवरून संकेत मिळत आहेत. मी पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज नाराज झाले असून, आम्ही संसार कसा केला हे या लोकांना माहिती नाही. किती कष्ट करत इथंपर्यंत पोहोचलो, याचा लोक अजिबातच विचार करत नाहीत. माझ्यापर्यंत ठीक होते… पण आता माझ्या मुलीला पण बोलले जात आहे. तिच्या कपड्यांबद्दल बोलले जात आहे. लोक किती खालच्या पातळीवर गेले हे कळते, असे त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना महाराजांनी सुनावले आहे. मी पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये एक क्लिप टाकणार आहे, असे देखील इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे. ….त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे. टीकेवर भाष्य करताना इंदुरीकर महाज म्हणाले, माझ्यापर्यंत सर्व टीका ठीक पण कुटुंबापर्यंत गेले आहे आणि हे अजिबात ठीक नाहीये. त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे. मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे, त्यांच्या या विधानामुळे महाराज किर्तन सोडणार असल्याचे संकेत मिळत आहे. पण त्यांनी अधिकृत अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे ते म्हटल्याप्रमाणे व्हिडीओद्वारे स्पष्ट करणार आहे, त्यामुळे व्हिडीओतून ते नेमकं काय म्हणतात आणि कोणता निर्णय घेतात हे पाहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Guava benefits: पेरू काही साधं फळ नाही, तर आहे अनेक आजारांचा शत्रू! जाणून घ्या त्याचे अनमोल फायदे