8th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) आणि महागाई भत्ता (DA) बंद होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एचआरए (HRA) आणि इतर भत्ते नियमितपणे सुरूच राहतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. ८व्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स (ToR) ला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. आयोग स्थापन करण्यासाठी नेमलेली समिती पुढील १८ महिन्यांत वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यासंबंधीचा आपला अहवाल सरकारला सादर करेल, अशी शक्यता आहे. काय आहे सत्य? भत्ते बंद होणार की सुरू? कर्मचारी संघटना आणि वित्त मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या मते, एचआरए (HRA), ट्रॅव्हलिंग अलाउन्स (TA), डीए (DA) यासह केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व भत्त्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. ८वा वेतन आयोग लागू होईपर्यंत, सर्व भत्ते ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मिळत राहतील. सरकारचे स्पष्टीकरण: वित्त मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की, महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्ते पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील. ‘फायनान्स ॲक्ट २०२५’ (Finance Act 2025) चा या भत्त्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. या सरकारी स्पष्टीकरणामुळे हे निश्चित झाले आहे की, ८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर एचआरए (HRA) किंवा इतर कोणतेही भत्ते बंद होणार नाहीत. DA मध्ये होणार मोठी वाढ – ८वा वेतन आयोग लागू होण्यास १८ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता दर ६ महिन्यांनी वाढतो. यानुसार, पुढील १८ महिन्यांत तीन वेळा डीए वाढेल. जर प्रत्येक वेळी ४ टक्क्यांनी वाढ झाली, तर एकूण १२ टक्के डीए वाढेल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ५८ टक्के आहे. त्यामुळे, १८ महिन्यांनंतर तो ७० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.