MS Dhoni : IPL 2026 खेळणार की नाही? महेंद्र सिंग धोनीने स्पष्टचं सांगितलं म्हणाला “अरे माझा गुडघा दुखतोय आता …”

MS Dhoni : देशभरात इंडियन प्रेमिअर लीगसाठी क्रिकेटप्रेमी वेडे आहेत. नुकताच २०२५ चा आयपीएल हंगाम संपला आता क्रिकेटप्रेमींना नव्या पर्वाची अर्थात आयपीएल २०२६ ची ओढ लागली आहे. मात्र, चैन्नई सुपर किंग्ज संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवणारा सर्वांचा लाडका माही अर्थात महिंद्रसिंग धोनी याने केलेल्या एका विधानामुळे चाहत्यांना धक्का बसण्याच्या शक्यता आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमात धोनीने आयपीयलच्या पुढच्या हंगामात खेळण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिलेले उत्तर चर्चेचा विषय बनले आहे. मी खेळेन की नाही हे मला माहित नाही, माझ्याकडे अजूनही हे ठरवण्यासाठी वेळ आहे, असं तो म्हणाला आहे. खरंतर माहीचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याने केलेल्या या विधानामुळे चाहते नाराज झाले आहे. मात्र, असं विधान करण्यामागचं स्पष्टीकरण त्याने दिलं आहे.
त्या प्रश्नावर काय म्हणाला माही?
मी खेळेन की नाही हे मला माहित नाही, माझ्याकडे अजूनही हे ठरवण्यासाठी वेळ आहे. माझ्याकडे डिसेंबरपर्यंत वेळ आहे, मी काही महिन्यांनी माझा अंतिम निर्णय घेऊ शकतो, असं त्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. यावेळी एका चाहत्याने त्याला खेळण्याचा आग्रह केला त्यावेळी अरे, गुडघ्याच्या दुखण्याची काळजी कोण घेईल? असं उत्तर दिलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Fans shouting u have to play sir
MS Dhoni : Who will take care of knee pain and smile 😃 pic.twitter.com/v1Msz9yval
— Yash MSdian ™️ 🦁 (@itzyash07) August 10, 2025
महेंद्र सिंग धोनीचे वय पाहता तो ४४ वर्षांचा झाला आहे. वयामानानुसार तो जास्त काळ खेळू शकणार नाही. डिसेंबरमध्ये एक मिनी आयपीएल लिलाव होणार आहे. यामुळे संघात अनेक बदल होऊ शकतात. धोनीच्या चाहत्यांना त्याने खेळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे या लिलावात काय होणार हे पाहणे महत्वाचं असणार आहे.
…तरीही ६ आयपीएल सामाने खेळले
एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो लवकरच आयपीएलमधूनही निवृत्त घेणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, तरीही त्याने 6 आयपीएल हंगाम खेळले आहेत. यामुळे धोनी IPL 2026 चा हंगाम खेळणार का नाही, हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा : “शिक्षण आणि आरोग्य सुविधा आवाक्याबाहेर, आता व्यवसाय बनले”; सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान





