Fuel prices : ‘या’ तारखेपासून इंधन दरात प्रतिलिटर 8 ते 15 रुपयांपर्यंत वाढ होणार?
Fuel prices : तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी येथे निवडणुका सुरु असून 29 एप्रिलला शेवटचे मतदान होईल आणि 4 मेला निकाल जाहीर होतील. अंदाजानुसार 29 एप्रिलनंतर किंवा 4 मेला निकाल जाहीर झाल्यानंतर दरवाढ लागू होऊ शकते.

Fuel prices : देशातील इंधन दरांबाबत लवकरच मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता असून, गेल्या अनेक दिवसांपासून स्थिरावलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर आता वाढीच्या उंबरठ्यावर आहेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली असून, याचा थेट परिणाम भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशावर होताना दिसत आहे. प्रादेशिक निवडणुकांचे मतदान पूर्ण होताच इंधन दरात प्रतिलिटर ८ ते १५ रुपयांपर्यंत वाढ होण्याची भीती वर्तवण्यात येत असून, यामुळे वाहतूक क्षेत्रासह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची चिन्हे आहेत.
तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी येथे निवडणुका सुरु असून 29 एप्रिलला शेवटचे मतदान होईल आणि 4 मेला निकाल जाहीर होतील. अंदाजानुसार 29 एप्रिलनंतर किंवा 4 मेला निकाल जाहीर झाल्यानंतर दरवाढ लागू होऊ शकते.
महागाई गगनाला भिडू शकते – (Fuel prices)

Fuel prices : ‘या’ तारखेपासून इंधन दरात प्रतिलिटर 8 ते 15 रुपयांपर्यंत वाढ होणार?
सध्या सरकार आणि सरकारी तेल कंपन्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नुकसान सोसत आहेत, मात्र हा भार अधिक काळ पेलणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कार्यकारी सदस्य शैलेंद्र गुप्ता यांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार, सध्याच साधारण १० टक्के ट्रक विविध कारणांमुळे उभे आहेत, मात्र जर डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली तर हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. भारतात सुमारे ७० टक्के मालवाहतूक रस्ते मार्गाने होत असल्याने डिझेलचे दर वाढल्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन महागाई गगनाला भिडू शकते.
सरकारी पंपांवर विक्रीवर मर्यादा –
दुसरीकडे, बाजारात इंधनाचा अनौपचारिक तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी ट्रक चालकांकडून येत आहेत. अनेक ठिकाणी डिझेलचा पुरवठा मर्यादित केला जात असून चालकांना वारंवार थांबावे लागत आहे, ज्यामुळे मालाची डिलिव्हरी करण्यास विलंब होत आहे. खासगी तेल कंपन्यांनी आधीच दरवाढ केल्यामुळे किंवा पुरवठा मर्यादित ठेवल्यामुळे सरकारी पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढली आहे. नायरा एनर्जी आणि रिलायन्स-बीपी सारख्या खासगी कंपन्यांनी हात आखडता घेतल्याने सरकारी पंपांवर विक्रीवर मर्यादा आणण्याची वेळ येत असल्याचे ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी नमूद केले आहे. Fuel prices
आगामी काळ वाहनधारक आणि वाहतूकदारांसाठी आव्हानात्मक –
सरकारने मात्र नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून देशातील पेट्रोल पंप सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या अहवालानुसार, जर कच्च्या तेलाचे दर ९५ डॉलर प्रति बॅरलवर राहिले, तर पेट्रोल-डिझेल १५ रुपयांपर्यंत महाग होऊ शकते. अगदी दर ८५ ते ९० डॉलरच्या दरम्यान राहिले तरी ३ ते ७ रुपयांची वाढ अटळ मानली जात आहे. सध्या ब्रेंट क्रूड ९६ डॉलरच्या आसपास असल्याने आगामी काळ वाहनधारक आणि वाहतूकदारांसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र आहे.





