…त्याच शाळा भरणार; महापालिकेकडून सुधारित आदेश जारी

सुरक्षा निकष पूर्णच्या अटी

पुणे – शाळा भरविण्यास मान्यता असली तरी या मान्यतेच्या आदेशात आज बदल करण्यात आला. आता, ज्या शाळा सुरक्षा निकष पूर्ण करतील, अशा शाळाच सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे सुधारीत आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत. ही शाळा तपासणीची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमिक विभागाचे प्रमुख आणि क्षेत्रीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे असणार असून त्यांनी प्रमाणित केल्यानंतर शाळा उघडण्यास मान्यता दिली जाणार आहे.

शाळांसाठी हे निकष असणार बंधनकारक : शाळेत स्वच्छता व निर्जंतूकीकरण झाल्याचे शाळेने प्रमाणित करावे. या सुविधांची तपासणी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून प्रमाणपत्र द्यावे त्यानंतरच शाळा उघडावी.

शाळा वाहतूक सुविधेचे निर्जंतूकीकरण करणे ते तपासून घेणे, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे करोना चाचणीचे प्रमाणपत्र क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणे, शाळेत दर्शनी भागावर करोना पासून सुरक्षेच्या सूचना नमूद करणे, पालकांकडून घेतलेले संमतीपत्र महापालिकेकडून प्रमाणित करून घेणे, वर्ग खोल्यामध्ये नसावेत, वर्गाचे दारे, खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.