Will Dashavatar 2 come? मराठी सिनेमातील कांतारा अशी ओळख निर्माण केलेल्या दशावतार सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घातला. कोकणातील सौंदर्य, संस्कृती आणि तिथल्या परंपरेचे दर्शन घडणाऱ्या दशावताराने सिनेमाने मोठा संदेश दिला. आता या सिनेमाचा सीक्वल येणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. या चर्चेदरम्यान दशावतारमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने दशावतारच्या सीक्वलबाबत मोठे विधान केले आहे. या सिनेमात मुख्य अभिनेत्री असलेली प्रियदर्शिनी इंदलकरने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दशावतर सिनेमावर भाष्य करताना केलेल्या विधानामुळे दशावतार 2 येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली की, “बरेच जण असंच म्हणतायेत की ‘दशावतार’चा सीक्वेल यावा. माझी तर खूप इच्छा आहे. पुढे ती म्हणाली, सिनेमात बाबुली काका मला हे सांगून जातात की, “भैरवीची वेळ झाली, आता पुढची जबाबदारी तुझी… तू हा लढा पुढे चालू ठेव…” यावरुन बरेच जण म्हणत आहेत की, पार्ट 2 आला तर त्यात वंदनाची भूमिका मोठी असेल. त्यामुळे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सीक्वेलचा विचार केला तर मी एका पायावर तयार आहे, असे म्हणत प्रियदर्शिनीने दशावतार सीक्वल तयार करण्याचा विचार सुरू असल्याची हिंट दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2025 या वर्षात अनेक मराठी सिनेमे रिजील झाले. या सिनेमांच्या लिस्टमध्ये सध्यातरी दशावतार सिनेमा सर्वेाच्च स्थानी आहे. मराठी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम दशावताराने केले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर सातासमुद्रापारही या सिनेमाचे शोज झाले आहेत. या सिनेमाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाने प्रेक्षकांना विचार करायाला भाग पाडले आहे. याशिवाय महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे आदी कलाकारांच्या देखील विशेष भूमिका दशावतारमध्ये आहेत. हेही वाचा : अमेरिकन डॉलरसमोर रुपया पुन्हा एकदा कोसळला ; जाणून घ्या नेमकं कारण काय ?