Eknath Shinde | Sharad Pawar – आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील दोन महत्त्वाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी सकाळी भेट घेतली.
पण या भेटीच्या काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वर्षावर दाखल झाले. या भेटीचे नेमके कारण समोर आलेले नाही. दरम्यान, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांच्या वर्षावर सुरू झाला आहे.
राज्यातील आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी दुपारी 2 वाजताच्या सुमारास शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा या बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचे स्वागत केले. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे अगदी 10 दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवारांनी शिंदेंची भेट घेतली होती.
त्यामुळे 10 दिवसांतील या दुसऱ्या भेटीची नेमकी काय गरज पडली? यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. याआधी 22 जुलैला शरद पवार आणि मुख्यमंत्री कनाथ शिंदे यांची भेट झाली होती. त्या भेटीमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण या विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
त्यासोबतच दूध दराचा प्रश्न, विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देणे या विषयांवर देखील प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. पण या भेटीबाबतची अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता या भेटीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली? याबाबतची माहिती घेण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.