लोकसभा निवडणूकीनंतर काका आणि पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? ; अजित पवार म्हणाले,”बारामतीचं मतदान होऊ द्या”

Ajit Pawar on Lok Sabha। देशातील लोकसभा निवडणुक महाराष्ट्रात काही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनलीय. त्यात बारामती मतदारसंघाचा समावेश आहे. कारण शरद पवार आणि अजित पवार एकमेकांविरोधात उभे आहेत. मात्र, 2024 ची लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का? , याविषयी अजित पवार यांनी सूचक भाष्य केलंय.
एकदा बारामतीचं मतदान होऊ द्या Ajit Pawar on Lok Sabha।
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का, असा सवाल करण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, “एकदा 7 तारखेला बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरु आहे. आम्ही तर पुढे एकत्रच येणार, असे सांगितले जात आहे. हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. त्यासंदर्भात माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला पाहिजे की, मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे. लोकांनी मला साथ द्यावी, मोठ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि मतदारांना मला भरभक्कम पाठिंबा द्यावा, असे अजित पवार यांनी सांगितले.
बारामतीच्या लढाईसाठी अजित पवारांनी मन घट्ट केलं Ajit Pawar on Lok Sabha।
आजपर्यंत बारामती म्हणजे पवार कुटुंब, असे समीकरण होते. परंतु, यंदा बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या एकमेकांविरोधात रिंगणात आहेत. कुटुंबातील या लढाईबाबत अजित पवार यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला.
बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, निवडणुकीत या भावनिक नातं चालत नाही. 7 मे पर्यंत भावनिक, मऊ व्हायचं नाही असे मी ठरवले आहे. बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करता आला तर तो अधिक जलद गतीनं करता येईल. ही लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही. देशासाठी ही लढाई लढायची आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.





