Ankita Lokhande Post : अंकिता लोंखडे गूड न्यूज देणार? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, नेमकं काय म्हणाली?
Ankita Lokhande Post : अंकिता लोखंडेच्या पोस्टमुळे लवकरच ती आनंदाची बातमी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Ankita Lokhande Post :टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडपे म्हणून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना ओळखले जाते. दोघांचाही सोशल मीडियावर सतत वावर असतो. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दोघेही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांची संख्या अधिक असून, चाहते नेहमी त्यांच्या पोस्टवर कमेंट्स करून प्रतिक्रिया देत असतात.
गेल्या काही दिवसांपासून अंकिताच्या गरोदरपणाच्या अफवा पसरत आहेत, परंतु दोघांनीही यावर मौन बाळगले असून, अद्यापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया याबाबत दिलेली नाही. अशातच अंकिता लोखंडेने तिच्या इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली असून, या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पोस्टमध्ये अंकिताने विकीसोबतचा केलेले फोटोशूट शेअर केले आहे. दोघेही रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. पोस्टमध्ये अंकिताने लिहिले आहे की, “सजना आणि सजनी. आमच्यात काहीतरी खास आहे. आम्ही एकमेकांसाठी बनलेलो आहोत. प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही व्हॅलेंटाईन डेपेक्षा महाशिवरात्रीची जास्त उत्सुकता बाळगतो कारण…” अंकिताने पुढे लिहिले आहे, “थांबा.”
View this post on Instagram
अंकिताच्या पोस्टवरून चाहते असा अंदाज लावत आहेत की, १५ फेब्रुवारीला घरोदरपणाची घोषणा करणार आहे. तशा कमेंट्स या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सध्या कलर्स टीव्हीवरील “लाफ्टर शेफ” मध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत. त्यांची केमिस्ट्री, भांडणे आणि प्रेम स्पष्टपणे दिसून येते. या शो व्यतिरिक्त, त्यांनी एका संगीत अल्बमवर देखील काम केले आहे. अंकिताने केलेल्या पोस्टमध्ये चाहत्यांना लवकरच आनंदीची बातमी मिळणार असल्याची आशा ते बाळगून आहेत.
हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज; तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय दिली माहिती?

