nagar | दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहणार

कर्जत (प्रतिनिधी): दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जय श्रीराम दूध संकलन केंद्राचे संचालक चेअरमन अनिल गांगर्डे यांनी केले.
तालुक्यातील कोंभळी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अचूक भरून शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अनिल गांगर्डे यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी ते बोलत होते.
चेअरमन अनिल गांगर्डे म्हणाले की, दूध अनुदानासाठी माहिती अचूकपणे भरणे गरजेचे होते. त्या माहितीमध्ये काही चुका झाल्या होत्या. त्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही खा. सुजय विखे पाटील यांना मुदतवाढ मागितली होती, त्यांनी तत्काळ दखल घेत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर सर्व माहिती पडताळून शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली.
अपलोड केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ९९ टक्के अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. राहिलेले अनुदान लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाचे आभार मानतो. अमोल गांगर्डे, गोरख गांगर्डे, तुषार तापकीर, निलेश काकडे, नितीन गांगर्डे, सतीश भापकर, दिलीप जोगदंड, प्रविण गांगर्डे, अनिल गांगर्डे, विलास काकडे, अक्षय गांगर्डे, आत्माराम गोरखे, संपत गोरखे आदींसह उत्पादक शेतकरी उपस्थित होते.





