Akshay Kumar and Vidya Balan : अक्षय कुमार आणि विद्या बालन पुन्हा एकत्र झळकणार? आगामी कॅामेडी चित्रपटाची अपडेट समोर
Akshay Kumar and Vidya Balan : अक्षय कुमारने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या आगामी चित्रपटाची हिंट दिली होती.

Akshay Kumar and Vidya Balan : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. हे दोघेही लवकरच एका आगामी विनोदी चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.
सध्या या चित्रपटाचे नाव ‘मौजा ही मौजा’ असे ठेवण्यात आले असून, भविष्यात त्यात बदल होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बाझमी सांभाळणार आहेत.
अक्षय कुमारने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या आगामी चित्रपटाची हिंट दिली होती. ज्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. त्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी हैदराबादमधील एका कार्यक्रमादरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही अक्षय कुमारसोबत एक चित्रपट पूर्ण केला आहे, जो फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होईल.”
यापूर्वी हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असून, २०२७ च्या फेब्रुवारी महिन्यात तो प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
अक्षय-अनीस बाझमी यांची जोडी पुन्हा एकदा दिसणार
अक्षय कुमार आणि दिग्दर्शक अनीस बाझमी यांनी यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘वेलकम’ (२००७), ‘सिंग इज किंग’ (२००८) आणि ‘थँक यू’ (२०११) या चित्रपटांमधून या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा विनोदी चित्रपटासाठी एकत्र येत आहे.
अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा ‘मिशन मंगल’ (२०१९) नंतर एकत्र येणारा हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांचीही चर्चा
दरम्यान, अक्षय कुमार सध्या अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्याच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘समूक’ या सायन्स फिक्शन थ्रिलरचा समावेश आहे. याशिवाय रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल ५’ आणि ‘भागम भाग २’ या बहुचर्चित फ्रँचायझींचे चित्रपटही त्याच्याकडे आहेत.





