पलक्कड – केरळमधील पलक्कड येथे एका जंगली हत्तीने रस्ता रोखून धरल्यामुळे आंतरराज्य महामार्गावर सुमारे १८ तास वाहतूक कोंडी झाली आणि दोन्ही बाजूला शेकडो गाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागला. मिळालेल्या बातमीनुसार हा जंगली हत्ती अचानक अथिराप्पिली-मलक्कप्पारा आंतरराज्य महामार्गावर दिसला आणि त्याने एक ताडाचे झाड तोडले. पडलेल्या झाडाने रस्ता अडवला गेला. त्यामुळे अनेक प्रवाशांना बराच काळ वाट पाहावी लागली. वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटक अन्न किंवा पाण्याशिवाय तासन्तास अडकले होते. हत्ती जंगलात परतल्यानंतर आणि रस्त्यावरील झाड काढून टाकल्यानंतर सकाळी ७ वाजता वाहतूक पुन्हा सुरू झाली.