गोविंदासोबत लग्न तुटण्याच्या चर्चांवर पत्नी सुनीताने स्पष्टच सांगितले…

Sunita Ahuja and Govinda | अभिनेता गोविंदा गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांच्या लग्नाला 38 वर्षे पूर्ण झाले आहेत. मध्यंतरी गोविंदा आणि सुनीता वेगळे होत असल्याचे वृत्त समोर आले होते.
गोविंदाचे कोणाशी तरी विवाहबाह्य संबंध असल्याच्या अफवांनी चांगलाच जोर धरला होता. मात्र, सुनीताने स्वतः या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. सुनीता म्हणाल्या होत्या की त्या आणि गोविंदा कधीही वेगळे होणार नाहीत.
टाइम्स नाऊशी बोलताना सुनीता म्हणाल्या, “ज्या दिवशी याची पुष्टी होईल किंवा माझ्या आणि गोविंदाच्या तोंडून तुम्ही ऐकाल, तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मला वाटतं की गोविंदा माझ्याशिवाय राहू शकत नाहीत आणि मीही गोविंदाशिवाय राहू शकत नाही. गोविंदा कधीही कोणत्याही मूर्ख स्त्रीसाठी आपल्या कुटुंबाला सोडणार नाहीत. या सगळ्या अफवा आहेत. मी हे कधीही मान्य करणार नाही. जर कोणामध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्याकडे थेट येऊन विचारावं. कोणी अफवा पसरवली म्हणून तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? हे योग्य नाही.” Sunita Ahuja and Govinda |
“जर असं काही घडलं तर मी स्वतः येऊन सर्वांना सांगेन आणि माध्यमांशी बोलेन. पण मला विश्वास आहे की देव माझं घर मोडणार नाही,” असे तिने सांगितले. याआधीही सुनीताने गोविंदा आणि तिच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले होते. सुनीताने लोकांना घटस्फोटाच्या अफवांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले होते.
दरम्यान, सुनीता १५ वर्षांची होती तेव्हा गोविंदाच्या प्रेमात पडली. त्यानंतर तीन वर्षांनी तिने गोविंदाशी लग्न केलं. लग्नात सुनीता १८ वर्षांची तर गोविंदा २४ वर्षांचा होता. सुरुवातीला लग्न झाल्याची बातमी गोविंदाने करिअरच्या फायद्यासाठी लपवली होती. गोविंदा व सुनीता यांना १९८८ मध्ये मुलगी झाली, तिचं नाव टीना आहे. त्यानंतर ९ वर्षांनी त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव यशवर्धन आहे. Sunita Ahuja and Govinda |
हेही वाचा:





