“इतक्या वर्षांनंतर याचिका का दाखल करण्यात आली?” दिशा सालियन प्रकरणी महायुतीमधील नेत्याचा सवाल

Disha Salian case | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे. या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील दिशाच्या वडिलांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “गेल्या दोन अडीच वर्षापासून या प्रकरणाची चर्चा होत होती. काल त्यांच्या वडीलांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन अनेकांवर गंभीर आरोप केले आहे. प्रश्न असा आहे की, इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचं नेमका उद्देश काय? त्याला अडीच वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे.” Disha Salian case |
महाराष्ट्राची दिशाभूल होता कामा नये
“मागील दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेला औरंगजेब विषय आणि काल रात्रीपासून सुरु झालेलं दिशा सालियनचा विषय आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. मूळ चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा जास्त खतपाणी घालू नये. दिशा सालियान प्रकरणात जे कोणी असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु दिशा सालियान प्रकरणामुळे महाराष्ट्राची दिशाभूल होता कामा नये. तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे,” असे अमोल मिटकरी म्हणाले. Disha Salian case |
दरम्यान, या प्रकरणावर आदित्य ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या पाच वर्षांपासून हे चालू आहे. पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात प्रकरण आहे, त्यामुळे कोर्टात बोलू,” असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. Disha Salian case |
हेही वाचा:




